उन्हाळ्याची सुट्टी ‘अशी’ करा यूजफुल

images 13 - Crazy Pyar
pyarcrazy

करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे सरकार विविध उपाय योजत आहेत. देशात बहुतांश शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अनेकांच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत…स्पर्धा परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. थोडक्यात उन्हाळ्याची सुट्टी थोडी जास्तच लवकर आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खरं तर ही एक पर्वणी आहे. मग काय मज्जा ना? काय करणार इतक्या मोठ्या सुट्टीचं? खरं तर तुम्ही एखादा लहानसा पार्ट टाइम जॉब करून कमाई करू शकता… पण थांब कमवायला आयुष्य पडलंय…आधी काहीतरी शिका तर…काय नवं शिकू शकतो आपण याचा विचार करा. अशा अनेक प्रोडक्टिव्ह गोष्टी आहेत ज्या तुम्ही समर व्हेकेशनमध्ये करू शकता. काय करता येईल तुम्हाला यासाठी आम्ही काही सुचवून पाहू का? पाहा यातलं तुम्ही काय करू शकाल ते…

​नवीन भाषा शिका

कोणतीही नवी भाषा शिकण्यासारखी मौज नाही. नवी भाषा शिकायची असेल तर वयाचं बंधन नाही. शिवाय कोणतीही चांगली किंवा वाईट वेळ नसते भाषा शिकायला. नवी भाषा शिकालात तर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळी, नवी संस्कृती शिकण्यासाठी तसेच प्रवासाच्या वेळी खूप मदत होऊ शकते. भाषा शिकण्यासाठी अनेक ऑनलाइन कोर्सही असतात. पुस्तकांच्या मदतीनेही तुम्ही शिकू शकता. नव्या भाषेची एक वेगळीच गंमत असते. तुम्हाला भाषेची आवड असेल तर तुम्हाला हा उपक्रम नक्की आवडेल.

​​खोलीचा करा कायापालट

download 5 - Crazy Pyar
pyarcrazy

तुमची खोली हे तुमचं अवकाश असतं. तुमची खोली ही तुमची क्रिएटिव्ह स्पेस असते. जर ही स्पेस नीट नसेल तर तुमचं अभ्यासातही लक्ष लागणार नाही. त्यामुळे आता घरीच असाल तर ही खोली आवरू शकाल, नव्हे छान सजवू शकाल. त्याला स्वत:चा असा एक वेगळा टच देऊ शकाल. तुमचा वेळही छान जाईल. स्वतंत्र खोली नसली तरी घरात प्रत्येकाची अशी एक जागा असतेच असते. ती सजवा…

​ऑनलाइन कोर्स करा

download 4 - Crazy Pyar
images 10 1 - Crazy Pyar
pyarcrazy

इंटरनेटवर अनेक प्रकारचे वेगवेगळे ऑनलाइन कोर्स उपलब्ध असतात. तुमच्या आवडीनुसार आणि आवश्यकतेनुसार उन्हाळी सुट्टीत तुम्ही एक नवं कौशल्य शिकू शकता. जर हा कोर्स उत्तम असेल तर भविष्यात तुम्ही तुमच्या सीव्ही मध्येही या कौशल्याचा समावेश करू शकाल. अगदी पाककलेपासून, कॅलिग्राफीपर्यंत अनेक गोष्टी ऑनलाइन शिकता येतात. एखादी गोष्ट शिकवणारे आजकाल युट्यूबवरदेखील खूप व्हिडिओ असतात. ते पाहून तुम्ही अनेक गोष्टी शिकू शकता. मोबाईल हा केवळ गेम खेळण्यासाठी नसतो, हे लक्षात घ्या.

झाडांशी करा मैत्री

images 8 - Crazy Pyar
Pyarcrazy

झाडं वाचवा, पृथ्वी जगवा… असा संदेशच दिला जातो. बीतून अंकुर फुटणं आणि त्याचं रोप हळूहळू वाढणं ही प्रक्रियाच हरखून टाकणारी असते. वृक्षसंगोपनासारखा दुसरा आनंद नाही. आपल्या खिडकीत, गच्चीत अशी बाग फुलवा आणि पाहा तुम्ही त्यात रमून जाल. रोपवाटिकेसंदर्भातलं प्रशिक्षण देणारे अनेक लहान कोर्सेसही असतात. विशेष म्हणजे यासंदर्भातल्या हौशी लोकांचे अनेक सोशल मीडिया ग्रुप किंवा पेजेसही असतात. तेथेही तुम्हाला खूप सारी माहिती मिळू शकते.

​स्वयंसेवक व्हा

स्वत:ला आनंद देणाऱ्या खूप गोष्टी असतात आयुष्यात. त्या सांगाव्या नाही लागत. पण कधी इतरांनाही आनंद देऊन पाहा. त्यात एक वेगळीच मज्जा असते. एखाद्या अनाथालयात किंवा वृद्धाश्रमात स्वयंसेवक म्हणून काम केलंत तर तुम्हाला आयुष्यात आनंद तर मिळेलच पण एक समृद्ध करून जाणारा अनुभवदेखील मिळेल. तुम्ही विनम्र व्हाल. हा अनुभव कुठलं कॉलेज, शाळा देऊ शकणार नाही. अनेक अशा एनजीओ देखील असतात, ज्या अशा कामांचं सर्टिफिकेटही देतात.

Leave a Reply